रेल्वे सुरक्षा दलातर्फे वृक्षारोपण

वरठी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भंडारा- रोड रेल्वे स्थानक येथे ५ जून वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांचे मार्गदर्शनात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात विविध प्रकारच्या १०० झाडांची लागवड करण्यात आली. प्रसंगी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सौम्य दत्ता, उपनिरीक्षक दीपक कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक विभा औतकर तसेच रेल्वे सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *