सिल्ली आरोग्य वर्धिनी येथे पर्यावरण दिनी वृक्षारोपण

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : एनसीडीसी, भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून, दि. ५ जून २०२३ ला, आरोग्य उपकेंद्र सिल्ली येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य वर्धीनी उपकेंद्राचे सीएचओ डॉ. रेवाकांत गभने, आरोग्यसे-विका चंदा चारमोडे, आरोग्यसेवक रवी निमजे हजर होते. आरोग्य वर्धीनी उपकेंद्र आवारात वृक्षारोपण करून, प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी करून, पर्यावरणाचे संवर्धन करण्याविषयी आरोग्यसेविका चंदा चारमोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. गभने यांनी वृक्ष लागवडीसाठी समुपदेशन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आशा स्वयंसेविका, मिनाक्षी साखरवाडे, संगीता बावनकुळे, शालू क्षिरसागर तसेच मदतनीस शालू उरकुडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.