न्यायालयाच्या परिसरात युवतीची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी ब्रम्हपुरी : येथील मुख्य प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकालगत असलेल्या न्यायालय परिसरात नवीन बांधकाम सुरू असून, त्याच ठिकाणी एका युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे मंगळवार, ६ डिसेंबर रोजी उघडकीस आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पौर्णिमा मिलींद लाडे (२७) असे युवतीचे नाव असून, ती गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथील रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या नव्याने होत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी युवतीने गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यावर माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाºयांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतक युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यासंदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. गळफास घेतलेल्या युवतीच्या पायावर जखमा असून, बॅडेज केल्याचे दिसत आहे. काही अन्य सुत्रांच्या माहितीनुसार ब्रम्हपुरी न्यायालयात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी मृतक युवतीच्या गावाकडील असून, दोघांचे लग्न निश्चित झाले होते. साक्षगंधानंतर ते तुटले. त्यामुळे मृतक युवती अनेकदा येथे येवून त्याच्या भेटी घेवून लग्नासाठी तगादा लावायची. सोमवार, ५ डिसेंबरला ती दिवसभर न्यायालय परिसरात फिरत असल्याची चर्चा येथे आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही. तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *