टाटासमो पलटली, २१ मजर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालोरा : शेतीकामासाठी बाहेरगावी महिला मजूर घेवून जाणारी टाटासूमो उलटल्याने २१ जण जखमी झाले. सदर घटना मुंढरी(बु.) येथे आज घडली. जखमींपैकी १८ जखमी महिलांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तर ३ महिलांना भंडारा जिल्हा रुग्णालयात अधिक उपचाराकरिता पाठविण्यात आले. जांभोरा गावातील महीला मजूर मोठया प्रमाणात बाहेरगावी कामासाठी जात असतात.

नेहमीप्रमाणे आज १४ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास टाटा सुमो क्रमांक एमएच ३१/सीआर ०४१४ मध्ये चालक जितेंद्र लांजेवार (वय ३०) ह २१ महिला मजूरांना घेवून तोंडरी गावासाठी निघाले होते. दरम्यान मुंढरी (बु) येथील मुख्य रस्त्यावर अचानक माकड आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले व सुमो रस्त्यावर पलटली. सुदैवाने जीवितहानी टळली. सर्व महिलांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. तर तीन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. करडी पोलीसांनी नोंद केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *