भंडारा जिल्हा क्रीडा संकुलाच्या अंतिम टप्प्याला मिळाली मंजूरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा येथील जिल्हा क्रीडा संकुलची दुर्दशा लक्ष्यात घेता शासनाकडे याच्या नवनिमार्णा करीता ७० कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे पाठपुरावा करीत राहिल्याने या कामाच्या अंतिम टप्याला आज मंजूरी मिळाली असून आता भंडाºयातील क्रीडा संकुलाचे लवकरच काया पालट झालेली बघता येईल आणि खेळाडूंना सुद्धा सोई उपलब्ध होतील. उल्लेखनीय आहे की भंडारा येथील क्रीडा संकुल निर्माण होऊन याला फार वर्षे लोटून गेली आहे, ज्या मुळे याची दुरावस्था झाली असून येथे येणाºया खेळाडूंना असुविधेला तोंड द्यावे लागत होते.

ही बाब लक्ष्यात येताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी क्रीडा विभागास क्रीडा संकुल नव निर्माण करीता प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. ज्यावर अमल करून ७० कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव सादर झाल्यावर आम. नरेंद्र भोंडेकर हे व्यक्तिश: पाठपुरावा करीत राहिले आणि यातील त्रुटी दूर करून प्रस्तावास मंजूरी मिळवून दिली. ज्या नंतर या संकुलाच्या निर्माण कार्य करीता प्रथम टप्पा म्हणून आठ कोटी आणि दुसºया टप्यात १५ कोटी मंजू केले गेले होते. याचा अंतिम टप्पाम्हणून आज शासनाच्या क्रीडा मंत्रालया द्वारे४७ कोटींना मंजूरी प्रदान केल्या गेली आहे. या मंजूरी नंतर भंडारा येथील क्रीडा संकुलाचे निर्माण कार्य लवकरच सुरू करण्यात येईल. नवीन क्रीडा संकुल निर्माण झाल्यावर येथे आधुनिक सुविधा असल्याने खेळाडूंना याला चांगलाच लाभ होणार असून खेळाडूंना क्रीडा जगत मध्ये नाव लौकिक करण्याचे अवसर प्राप्त होऊ शकतील. ज्या करीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा मंत्र्यांचे आभार मानले आहे.

आम. भोंडेकर यांची भंडारा-गोंदिया लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या लोकसभा संपर्क प्रमुख पदी आम. नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नागपूर येथील निवास स्थानी आम. भोंडेकर यांना दिले आणि पक्ष वढी करीता काम करतील असा विश्वास त्यांच्यावर वर्तविला. निवडणूक २०२४ ला लक्ष्यात घेता शिवसेने द्वारे भंडारा गोंदिया लोकसभेला विशेष महत्व दिले जात असून या क्षेत्रात शिवसेना पक्ष वाढी करीता हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या करीता आम. नरेंद्र भोंडेकर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. आम. नरेंद्र भोंडेकर यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्त करण्यात आले. या नियुक्ती नंतर आम. भोंडेकर यांनी सांगितले की पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन दिलेली जवाबदारी ही निभावणे त्यांचे कर्तव्य आहे आणि ते पक्ष वाढी करीता पूर्ण निष्ठा ठेवून प्रयत्न करतील. या करीत त्यांनी पक्षतील अन्य पदाधिकाºयां कडून सहकार मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या या नियुक्ती करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *