पावसाची संततधार,गोसेखुर्दचे सर्व ३३ दरवाजे उघडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासुन सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचुन नागरीकांचे जनजीवन प्रभावीत झाले आहे.तर अनेक मार्ग प्रवासाकरीता बंद करण्यात आले आहे. दोन दिवसापासुन कोसळणाºया संततधार पावसामुळे जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले . भंडारा जिल्ह्यात आज पडलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ दरवाजे उघडले आहेत. यापैकी २३ दरवाजे हे १ मीटरने तर १० गेट अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून ६२६३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भंडारा जिल्ह्यात सतत पावसाने गोसीखुर्द धरणात पाण्याची आवाक अद्यापही वाढत आहे. गोसीखुर्द धरणात पाणी पातळीत आज दिवसभरात दुसºयांदा वाढ झाल्याने संपूर्ण ३३ पैकी ३३ दरवाजे उघण्यात आले आहेत.

यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातही पावसाची तशीच अवस्था आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गोंदिया तालुकासह दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर येत्या दोन दिवसातसुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस असणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. गोंदिया जिल्हा हा येलो अलर्टमध्ये आहे. जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे. पण दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *