रमाई माता याच्या जयंती निमित्त वृद्धाश्रम येथे फळ वाटप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात यांच्या खारीच्या वाटा आहे त्यांच्या पाठशी खंबीरपणे उभे असणाºया माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय औषधी अनुषंधान संस्था भंडारा बेला येथील वृद्धाश्रम येथे कपिल नगर मित्रा परिवारा तर्फे फळ वितरण करण्यात आले.यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री वानखेडे सर, व त्यांचे आफिस स्टाफ व तिथे राहणाºया सर्व आमच्या आजी बाई उपस्थित होत्या. रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रमाई बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित कपिल नगर येथील हर्षल टेंभुरकर,ईश्वर टाले, युवराज गजभिये, उमेश मडावी, कौशिक कडव, अमोल निनावे, साहिल मांडुरकर,सोहम डोरले, श्रीकांत बन्सोड, विनितकुमार देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हर्षल ठेम्भूरकर यांनी केले व मनोगत विनितकुमार देशपांडे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *