सातोना प्रकरणी कठोर कारवाई करा! मअंनिस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वरठी पोलीस स्टेशन येथे अंतर्गत येणाºया सातोना येथील एका युवकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर घातला सदर प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºय सातोना या गावातील एका युवकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पोलीस विभागाने शोध घेऊन सदर मजकूर कोणत्या माहितीच्या स्रोतावर उपलब्ध आहे याचा शोध घेऊन सदर मजकूर ताबडतोब काढून टाकण्यात यावा. समाजात अशांतता पसरविणाºय व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, प्रा. नरेश आंबिलकर, नितेश बोरकर, अर्पित मेश्राम, कार्याध्यक्ष प्रकाश नाकतोडे, प्रा. युवराज खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयुक्त मुंबई यांना जिल्हा अधीक्षक आबासाहेब तांबे भंडारा यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *