बिबट्याच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : स्थानिक वनक्षेत्र सहवनक्षेत्र लाखनी बीट अंतर्गत येणाºया गोंडसावरी येथे आज दिनांक १२ रोजी पहाटे ३.३० वाजता जनावरांच्या गोठ्यात गुरांचा आरडा ओरडा ऐकून दुलीचंद नत्थुजी राऊत बघण्यासाठी गेले असता गोठ्यात असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की राऊत यांच्या घरी गोठयात गाई व वासरांचा आवाज ऐकू आल्यानंतर गोठ्यात जाऊन बघितले असता बिबट्याने हल्ला केला. त्यात राऊत यांच्या पाठीवर बिबट्यांच्या नखांचे ओरखडे पडलेले आहेत.

बिबट्याने पाठीवर हल्ला केल्यानंतर राऊत खाली पडले . सदर घटनेची माहिती सकाळी ७ वाजता वन समितीचे अध्यक्ष महेश घरजारे यांनी भ्रमणध्वनी द्वारे क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक त्रिवेणी गायधनी, सर्पमित्र मयूर गायधने यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुलीचंद राऊत यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पगमार्कचे निरीक्षण केले असता मादी बिबट व त्याची दोन पिल्ले सोबत असल्याचे निदर्शनास आले आहे. गोंडसावरी ह्या जंगलव्याप्त गावात वन्यप्राण्याची नेहमी भीती असते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *