हरदोली येथे कृषी पंपासाठी नवीन विद्युत डीपी द्या; शेतक-यांची मागणी

भंडारा पत्रिका/ वार्ताहर पांढराबोडी : शासन प्रशासनाच्या अधिनस्त सबंधित विभागाच्या यंत्रणेने मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील पांढरा बोडी कडे जाणा-या मार्गा जवळील विलास झंझाड यांच्या शेता लागत कृषी साठी असलेल्या विद्युत डीपीवर क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन असल्याने सदर डीपी तेवढा विद्युत भार देऊ शकत नसल्याने μयूज उडणे, डिपी जळणे अशा समस्या निर्माण होत असून हरदोली येथील शेतक-यांना सिंचनाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची दस्तुरखुद्द शेतकरी बांधवांची ओरड असून मोहाडी व भंडारा विद्युत विभागाच्या सबंधित यंत्रणेने गांभीर्यान विचार करून हरदोली झंझाड येथे कृषीसाठी नवीन विद्युत डीपी बसविण्याची मागणी विविधकार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदाधिका-यांनी केली आहे.                                    हरदोली झंझाड येथील शेतकरी बांधवांना शेतातील विविध पिकांना कृषी वीज पंपाद्वारे सिंचन करण्यासाठी डीपी ची व्यवस्था करून सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली आहे परंतु या डीपीवरुन ब-याच शेतकरी बांधवांची कृषी वीज पंपाची वीज जोडणी करून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला असून या डीपी वरुन क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन जोडणी असल्यामुळे वेळोवेळी μयूज उडणे किंवा डीपी जळणे हे प्रकार होत असल्याने चार पाच दिवस विद्युत खंडित राहत असल्या कारणाने पिकांना सिंचन करता येत नाही. याचा परिणाम पीक उत्पादनावर होत असतो. यावर्षी हरदोली येथील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली असून या पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते परंतु सदर डीपी पुरेसा विद्युत भार क्षमता प्रदान करणारी नसल्यामुळे नागरिकांना सिंचन करता येत नसल्याने सिंचना अभावी उन्हाळी धान पिकाची करपण्या ची शक्यता नाकारता येत नसून यामुळे शेतकरी बांधवांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून याबत मोहाडी व भंडारा विद्युत विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या तरीपण सबंधित विभाग सदर समस्या सोडवण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी बांधवांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे. सदर समस्या सुटली नाही तर या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावरून सबंधित विभाग सुस्त व शेतकरी त्रस्त अशी स्थिती निर्माण झाली असून सबंधित विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी मोका पाहणी करून उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *