सुगंधीत तंबाखू विकणा-यावर धाड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन बोस वॉर्ड येथे धाड घालून १ हजार ४३५ रुपयाचा प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखू आढळून आल्याने इसमावर गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी डाहारे यांनी मिळालेल्या माहितीवरुन बोस वॉर्ड, सराफा लाईन तुमसर येथे जावून धाड टाकली. त्यावेळी कमल विमलदास थावानी (५०) याच्याकडून अजम गोल्ड नावाचा १ किलो सुगंधीत तंबाखु, १०८ मजा, बहार खानदानी पान मसाला, पान बहार, पान पराग प्रिमियम नावाचा १ पॅकेट असा एकूण १ हजार ४३४ रुपयाचा माल मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.