विजय ढोमणे यांना आदर्श ‘सुवर्णरत्न’ पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ते व समाजप्रेमी विजय ढोमणे यांचे नुकतेच आदर्श सुवर्णरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात समाजाचे राज्यस्तरीय सोनार महोत्सवाचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विजय ढोमणे यांना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन आदर्श सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सुवर्णलंकार मासिकाचे संपादक प्रकाश माथने, महाराष्ट्र सुवर्णकार समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे, सौरभ ढोमणे, बांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भंडारा येथील रहिवासी असलेले विजय ढोमणे यांनी मे २००१ पासून इतर सामाजिक कार्यासहित व सोनार समाजाच्या हितासाठी स्वत:ला झोकून घेतले.

यासाठी सोनार समाजाचे मासिक ‘सुवर्णकार’ यातून त्यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य सुरु केले. सोनार समाजाला एकत्र आणण्याचे काम महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. जिल्हाभर घरोघरी जाऊन मासिकाची माहिती समाजाला दिली. सोनाराच्या किंवा समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या मासिकाच्या माध्यमातून मांडूनसमस्येला वाचा फोडण्याचे कार्य सतत सुरु ठेवले. यामुळे जिल्हाभर सोनार समाजाची चांगल्या प्रकारे मोटबांधणी झाली. सत्तरी गाठलेले विजय ढोमणे हे आजही त्याच उत्साहाने समाज हिताचे कार्य करीत आहेत. सुवर्णकार मासिकाला २५ वर्षे पूर्ण झालीत. नुकताच मासिकाचा रजत महोत्सव सुरेश भट सभागृहात पार पडला. यात सुवर्णलंकार मासिकात २३ वषार्पासून अविरत सेवा देणा-या विजय ढोमणे यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विजय ढोमणे यांना याआधीही अनेक पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले. यात भारतीय स्वर्णकार समाज इतवारी नागपूरच्या वतीने समाज गौरव पुरस्कार, २००६ ला राज्यस्तरीय सोनार महोत्सवात सन्मानपत्र, गोंदिया जिल्हा सोनार समाजाच्या वतीने २००६ ला सन्मानपत्र नागपूर येथे संतनरहरी महाराजांच्या सामूहिक पुण्यतिथी महोत्सवात सन्मानपत्र, २०१५ ला भंडारा जिल्हा सुवर्णकार समाजाच्या वतीने स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव, २०१५ ला वरठी सुवर्णकार समाज संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव, शिवाय २०१५ लाच महाराष्ट्र सुवर्णकार समाज संघटना संस्था नागपूर येथील राजवाडा पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन विजय ढोमणे यांच्या सत्कार करण्यात आला. विजय ढोमणे हे जिल्हा परिषद मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पत्नी ह्या नूतन कन्या शाळेत शिक्षिका होत्या. मोठा मुलगा वृजेश ढोमणे हा डॉक्टर आहे. तर लहान मुलगा विकल ढोमणे हा एमआर म्हणून कार्य करतो. काही दिवसापूर्वी विजय ढोमणे यांच्या पत्नीचे त्या दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यामुळे दु:खाचे डोंगर कोसळले असले तरी समाजबाबतची धडपड त्यांची आजही दिसून येते. ७० वर्ष पार करणारे विजय ढोमणे हे मनाने खचले नाहीत. आजही समाजातील विविध समस्या जाणून घेतात. घराघरापर्यंत जाऊन मासिकाच्या माध्यमातून सोनार जोडण्याचे काम सतत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली. विजय ढोमणे यांना मिळालेल्या सन्मानाबाबत सर्व स्तरावर त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *