गायमुख यात्रेत १३५ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

यशवंत थोटे मोहाडी : महाराष्ट्रसह विदर्भातील व मध्य प्रदेशात गाजलेल्या गायमुख येथील छोट्या महादेवाच्या यात्रेला चार ते पाच लाख भाविकांची गर्दी उसळणार असून या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंधळगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारासह १३५ कर्मचारी यात्रेवर नजर ठेवून यात्रा शांततेत सुरक्षित पार पडावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेºयाच्या सहाय्याने आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार यांनी सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून मोठा तगडा बंदोबस्त लावलेला आहे. मागील तीन वर्षाच्या अगोदर पासून कोरोनामुळे गायमुख यात्रेवर मोठे विरजण पडलेले होते.

मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गायमुख यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांच्या हर हर महादेवाच्या गजरात जोमाने आगमन होत असल्याने गायमुख यात्रेवर प्रशासनाने आपली व भक्तांची सुरक्षा ठेवण्याकरिता प्रबळ असा बंदोबस्त लावलेला आहे. जेणेकरून यात्रेत कोणत्याही भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारच्या त्रास होणार नाही किंवा कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. गायमुख तीर्थक्षेत्र येथे प्राचीन काळात एक ऋषींनी भगवान शिव शंकराची तपस्या केली असल्याची अध्यात्मिक भावना या परिसरात मोठ्याने बोलल्या जात आहे. गायमुख हे तीर्थस्थळ सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असल्याने नैसर्गिक दृष्ट्या व न समृद्धीने नटलेले आहे.

या तीर्थस्थळावर भगवान भोले शंकराचे प्राचीन शिवलिंग असल्याने इथे गेल्या अडीचशे वर्षापासून भगवान शिव शंकराची मोठ्या जल्लोषाने महाशिवरात्रीनिमित्त पूजा अर्चना करण्यासाठी भाविक महाराष्ट्र विदर्भासह मध्य प्रदेशातील भक्त गर्दी करीत असतात. सुरुवातीला ही यात्रा १५ ते २० दिवस मोठ्या जल्लोषाने चालायची. मात्र कालांतराने परिस्थितीला अनुकूल भाविक भक्तांनी यात्रेच्या प्राचीन रूपास अत्याधुनिक पद्धतीने सुरुवात केली. गायमुख यात्रेत पंचमीच्या दिवशी गोंड समाजाचे शिवभक्त आपला हर हर महादेवाच्या गजरात मोठ्या उत्साहाने पोहे घेऊन यायचे.

या गायमुख तीर्थस्थळी पार्वतीच्या हिवर, कोरडी विहीर, गोरखनाथ मंदिर, माता सप्तशृंगी चे विशाल असे मंदिर व विशेष म्हणजे सातपुडा पर्वतरांगेच्या आतून येणाºया वाहत्या गोमातेच्या मुखातून पडणाºया पाण्याचे विशेष असे अतुलनीय दर्शन भाविक भक्तांना करावयास मिळते. याच गोमातेच्या मुखातून पडणाºया पाण्यामुळे भाविक भक्त आपले स्नान करून भगवान भोळ्या शंकराची आराधना करतात. या यात्रेत भाविक भक्तांच्या सेवेसाठी एसटी महामंडळामार्फत विशेष बसेसचा भंडारा व तुमसर आगारातून सुविधा दिली जाते.

प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत भाविक भक्तांच्या उपचारासाठी जागोजागी हेल्थ केअर सेंटर उघडण्यात येते, परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना माध्यमातून भक्तांसाठी विविध फराळांचे नाश्ता, महाप्रसाद प्याऊ यांचे स्टॉलस लावण्यात येते. तर वन विभागामार्फत जंगलाला सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाची कर्मचारी संपूर्ण जंगलात गस्त घालून आपली वनाचे संरक्षण करीत असतात. अशा या लाखो भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदारासह व वरिष्ठ कर्मचाºयांच्या मध्यस्थीने यात्रेवर बारकाईने नजर ठेवण्याची मोठी जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, आंधळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार यांनी सांभाळली, हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *