अनैतिक संबंधातुन सुनीलची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील रहिवासी सुनील बांन्ते याची प्रेत आज सकाळी बघोली परिसरात आढळून आल्यावरुन या परिसरात एकच खळबळ माजली तर हे घटनास्थळ तिरोडा व दवनीवाडा पोलीस स्टेशनचे सीमेवर असल्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी आपल्या ताμयासह घटनास्थळी पोहोचले असता घटनास्थळ दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यान दवनीवाडा पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता संशयाची सुई चांदोरी येथील एका विधवा महिलेचे अल्पवयीन बालकावर स्थिर झाल्याने त्यांनी या बालकास चौकशी करता बोलावून विचारपूस केली असता त्यांने हत्या केल्याचे कबूल केले.

आज दिनांक २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता चे दरम्यान चांदोली खुर्द टोला ते बघोली रस्त्यावर एका इसमाचे प्रेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली असता या इसमाची सायकल व त्याचे कपड्यावरून हा ईसम चांदोरी खुर्द टोला येथील सुनील देवदास बान्ते वय ४० वर्ष असल्याचे निष्पन्न झाले मात्र घटनास्थळ तिरोडा व दवणीवाडा पोलीस स्टेशनचे सीमेवर असल्याने पंचायत समिती तिरोडा उपसभापती हुपराज जमईवार यांनी दवनीवाडा व तिरोडा पोलिसांना माहिती दिल्यावरून दवनीवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील आपल्या ताμयासह तसेच तिरोडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, अभिजीत जोगदंड ,शिपाई शैलेश दमाहे विदेश अंबुले यांनी घटनास्थळ गाठले असता घटनास्थळ दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने दवनीवाडा पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवले व लगेच या हत्येचे मागे असलेल्या आरोपीचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी सुरू केला असता त्यांना ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची कुण कुण लागल्या वरून त्यांनी यातील आरोपीचा संशयावरून चांदोरी खुर्द येथील एका महिलेशी मृतकाचे अनैतिक संबंध असल्याचे माहिती मिळाल्या वरुन त्त्या दिशेने शोध सुरू केला असता चांदोरी खुर्द येथील एका महिलेचे मृत्यकाशी अवैध संबंध असल्याची बाब पुढे आल्यावर त्यांनी या महिलेचे अल्पवयीन मुलास विचारपूस केली असता त्याने आपले आईशी मृतकाचे मागील काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याने तसेच मृतकाने न आपल्यास बरेचदा मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मनात राग होता व आपण संधीची वाट पाहत होतो व ही संधी 1 तारखेची रात्री आपणास मिळाल्या वरून मृतक बघोली कडून चांदोरी कडे सायकलने जात असता आपण त्याचे डोक्यावर पावड्याच्या दांडुक्याने दोन वार केल्याने घटनास्थळीच मरण पावला असे कबूल केल्यावरून दवनीवाडा पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *