जागेच्या वादावरून काका ने केला पुतण्याच्या खून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील पोलीस स्टेशन हद्दीतील गुंथारा येथे घराच्या जागेच्या वादावरून सख्या काकाने पुतण्याच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता. १) रात्री१०.४५ वाजताच्या दरम्यान घडली. महेश बंडु जगनाडे वय ३५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काका मोहन किसाराम जगनाडे वय ६५ वर्ष रा.गुंथारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक महेश बंडू जगनाडे हा ट्रक ड्रायव्हर असून त्याचे वडील मरण पावले आहे व आरोपी मोहन जगनाडे हे सख्खे काका पुतणे असून घराचे जागेचे हिस्या वरून नेहमी वाद होत होते. शनिवारी (ता.१) ला दुपारी २.०० वाजताच्या माझ्या घराचा हिस्सा दे म्हणुन भांडण केला होता. नाहीतर तुझा मर्डर करीन असे आरोपीस म्हणाला व आप-आपल्या घरीनिघुन गेले.

रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास पोलीस पाटील नरेन्द्र सदाशिव सार्वे यांना गावातील नागरिकांकडून फोन वरून माहिती मिळाली की महेश बंडु जगनाडे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. अशा माहिती वरून पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता महेश जगनाडे हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अव्यस्थेत पडलेला होता. त्यास गावातील नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले. तेथिल वैद्यकीय अधिकारी यांनी महेश जगनाडे यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस पाटील नरेन्द्र सार्वे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी सुमारास यातील आरोपी काका मोहन आरोपीला अटक केली असुन त्याची दोन जगनाडे हा गावाच्या चौकात बसला असता यातील मृतक महेश बंडु जगनाडे याने तु दिवसा करीता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *