रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वरठी : शेतशिवारातील रस्त्याने जाणा-या दुचाकीला अचानक रानडूकराने धडक दिल्याने ५० वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कोका-नवेगाव रस्त्यावर घडली. हरीभाऊ तूळशीराम कुंभरे रा.नवेगाव असे जखमीचे नाव आहे. हरीभाऊ हे कोका येथून स्वगावी नवेगाव येथे आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने परत जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला रस्त्यालगतच्या झूडपातून अचानक आलेल्या रानडूकराने जोरदार धडक दिली. यामुळे हरीभाऊ हे दुचाकीवरून रस्त्यावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला व हातापायाला दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर कोका येथील वनअधिकारी धारणे व शिल्पा झंझाड यांनी पंचनामा केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *