१०८ फुट उंच हनुमान मूर्तीच्या बांधकामाचा शुभारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : भंडारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष रमेशभाऊ डोंगरे आणि त्यांचे परिवार हे मागील २० वर्षांपासून सतत, महाशिवरात्री निमित्ताने भगवान शंकर देवस्थान मंदिर, लाखांदूर चुलबंद नदीतीरावर यात्रेचे दरवर्षी आयोजन करीत असतात. याच चुलबंध नदी तीरावर मागील वर्षी पासून भव्य अशा हनुमान मूर्तीचे पायव्याचे बांधकाम चालू होते. ते पूर्ण होऊन आज १० फेब्रूवारीला मूर्तीच्या बांधाकामाचा शुभारंभ माजी जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, भा. रा. कॉ. जिला अध्यक्ष मोहन पंचभाई, नगराध्यक्ष विनोद भाऊ ठाकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष उत्तम भाऊ भागडकर तसेच तालुक्यांतील गण्य मान्य व्यक्तीच्या उपस्थितीत संपन्न झाला. तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त शिवशंकराच्या दर्शनाला येतात, रमेश डोंगरे व कुटुंबियांनी सन २००२ साली भगवान शंकर देवस्थान मंदिर, लाखांदूर चुलबंद नदीतीरावर शिवमुर्तीची प्रतीष्ठापना केली. अनेक हालअपेष्ठा सहन करतांना या शिवतिर्थाच्या निर्माणावेळी काही समाजकंटकांनी विरोधही केला. माञ डोंगरे कुटुंबिय न जुमानता त्यांनी या चुलबंद नदीतीरावर शिवतिर्थाची निर्मीती केली. अविरत कष्ट सहणाºया एका सामान्य मानसाकरवी झालेल्या या असामान्य कमार्ला जनु या भागातील जनताच वाहुन गेल्याचे चिञ दिसत आहेत. आज हे शिवतिर्थ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे.

आज या ठिकाणी भव्य अशा १०८ फूट उंच मूर्तीचे बांधकाम सुरू झाले. असून संपूर्ण देशात हे एका सामान्य माणसाच्या हतून होत असलेले मोठे कार्य आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रामुख्याने नगरपंचायत चे गटनेता बबलु नागमोती, नगरसेवक रज्जू पठाण, प्रभू राउत, यशवंत लांडगे, गोपाल घाटेकर, कैलास जांभूळकर, गोपाल पारधी, आदित्य बगमारे, वामन मिसाळ, बालकिसन गोडशेलवर, लेकराम ठाकरे, सुध्दोधन मेश्राम, प्रकाश कांबळे, मिसार, सुनील बोरकर, दिनेश कुडेगावे, अशोक कांबळे, सुरज चचाने, सुनिल बारसागडे, मनोज बनसोड, सरपंच संदीप कोरे, निलेश बगमारे, उत्तरराव दोनाडकर, सुधाकर घोरमोडे, मूर्तिकार धोंडीराम केंद्रे, मोहन वल्लाई, सत्यप्रकाश दास तसेच रमेश डोंगरे यांचा संपूर्ण परिवार व अन्य भक्त गण उपस्थीत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *