गारपीट व अवकाळीने शेतकरी बेहाल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अवकाळी आलेला पाऊस आणि प्रचंड गारपिटीमुळे १० फेब्रुवारीच्या रात्री भंडारा तालुक्यात शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पीक उध्वस्त झाले. याची माहिती मिळताच खा. सुनील मेंढे यांनी त्वरित जिल्हाधिकाºयांशी व संबंधित विभागाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे कायम अडचणीत येत असताना आज रविवारला पुन्हा एकदा या परिस्थितीचा सामना करावा लागला. १० फेब्रुवारीच्या रात्री एक वाजता च्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालं. मात्र भंडारा तालुक्यातील शेतकºयांना याचा सर्वाधिक फटका बसला. तालुक्यातील काही भागात सलग अर्धा तास मोठ्या आकाराची गार पडल्याने शेतातील गहू, भाजी, फळ पिक उद्ध्वस्त झाले.

गहू झडून खाली पडले तर वांगे गारीच्या मारामुळे फुटून गेले. ही गारपीट इतकी मोठी होती की, आज सकाळ पर्यंत गार विरली नव्हती. दरम्यान याची माहिती खासदार सुनील मेंढे यांना मिळताच त्यांनी तळमळीने शेतकºयांची फोनवरून विचारपूस केली. कुणीही अधिकारी, कर्मचारी दखल घेत नसल्याचे सांगण्यात आल्या नंतर खासदारांनी ताबडतोब जिल्हाधिकाºयांना दूरध्वनी वरून संवाद साधला. झालेली परिस्थिती भयंकर असून शेतकºयांच्या पाठीशी प्रशासनाने खंबीर पने उभे रहावे असे सांगितल. ज्या ज्या भागात नुकसान झाले आहे, तेथे जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम ताबडतोब करा, अशा सूचना वजा निर्देश खासदारांनी दिले. अधिवेशन संपवून रात्री उशीरा भंडारा येथे पोहचलेल्या खासदारांनी शेतकºयांसाठी प्रशासनाला दिलेले निर्देश शेतकºयांना नक्कीच धीर देणारे आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *