ढिवर समाजाच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार -डॉ. परिणय फुके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजावर फार मोठे अन्याय झालेले आहे. हा समाज अनुसूचित जातीच्या आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळे या समाजाला कोणत्याही क्षेत्रात संधी मिळू शकली नाही. आजही हा समाज जेथेच्या तेथे आहे. त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणयजी फुके यांनी केले. अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा व गोंदियाच्या शिष्टमंडळाने दि. ०२ मार्च २०२४ रोजी डॉ. परिणयजी फुके यांची भेट घेऊन समाजाच्या विविध विषयांवर चर्चा केली. राज्यात जून ते आॅगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मत्स्य सह. संस्थांचे तलावांतील मत्स्य बीज वाहून गेले, यामुळे यात अतोनात नुकसान झाले.

यासाठी शासनाने नुकतेच शासन निर्णय काढून नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. यासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री डॉ. परिणयजी फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मत्स्य संस्थांना अतिवृष्टी नुकसानबाबत निधी उपलब्ध करून दिला. यासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री डॉ. परिणयजी फुके यांचे समितीच्या वतीने पुप्षगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. मत्स्य संस्थांच्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात ईकार्निया वनस्पती वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामकृष्णजी शिंदे, समितीचे अध्यक्ष मनोज केवट, उपाध्यक्ष अशोकजी शेंडे, सचिव गोविंद मखरे, लोकेश नगरे, अरविंद नगरे, शालिकजी वलथरे, चंद्रभानजी मांढरे, मनीरामजी नान्हे, महेंद्र चाचेरे, राजकुमार पचारे, व अन्य समाज बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *