सिल्ली येथील स्मशानभूमीच भोगतेय मरणयातना

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : ग्राम पंचायत जवळून जाणाºया रस्त्यावरुन काही अंतरावर असलेली सार्वजनिक स्मशानभूमी अनेक समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. अर्धवट बनविलेला रस्ता पावसाळ्यात चिखलमय असतो. पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच विजेचीही सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अंत्यविधी करण्यासाठी येणाºया नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेली स्मशानभूमी सद्यास्थितीत झाडीझुडपीच्या विळख्यात सापडली आली आहे. स्मशानभूमीपर्यंतचा अर्धा रस्ता चिखलमय होत असल्याने खडतर जीवनप्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत आहे. यामुळे सध्या ही स्मशानभूमी मरणयातना भोगत असल्याचे चित्र आहे. भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी शेडच्या सभोवती झाडीझुडपी वाढलेली असून कचºयाच्या सम्राज्य वाढले आहे. तसेच स्मशानभूमीत शोक सभेकरिता सभा मंडप नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना कचºयात उभे राहून अंत्यविधी संस्कार करावे लागत असून स्मशानभूमीत कचरा कि कचºयात स्मशानभूमी अशी अवस्था या स्मशानभूमीची झाली असून यावर ग्राम पंचायत प्रशासन काय करते? याकडे लक्ष गावकºयांचे लक्षलागले आहे.

सिल्ली येथील स्मशानभूमीकडे जाणारा अर्धा रस्ताचे सिमेंटीकरण करण्यात आले असूनअर्धा रस्ता चिखलमय झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी गवत वाढले आहे. त्यामुळे अंत्यविधीकरिता जाणाºया नागरिकांना पायवाट शोधताना कसरत करावी लागते. स्मशानभूमी परिसरातही काटेरी झाडीझुडपे आणि अनावश्यक रानगवत वाढले असून अंत्यविधीकरिता येणाºया नागरिकांना अंत्यदर्शनासाठी जीव मुठीत घेऊन कचºयात अंत्यविधी आटपत पर्यंत उभे राहावे लागते. सध्या अंत्यविधीच्या जागेची दुरवस्था झाली असून बसण्यासाठी सुद्धा योग्य सुविधा उपलब्ध नाही. स्मशानभूमीच्या सर्व बाजूने बाभळीचे काटे व झाडे झुडपे वाढली आहेत. त्यातच या स्मशानभूमिकडे जाण्यासाठी रस्ता नाही. काटेरी झुडपातून नागरिकांना जावे लागते. रात्रीच्या वेळी अंत्यविधी करायचा असल्यास भाड्याने आणलेल्या गॅस बत्तीच्या उजेडात किंवा मोटार सायकलचे लाइट सुरू ठेवून अंत्यविधी करावा लागतो. काटेरी झुडपाचा विळखा, भूईसपाट झालेले रस्ते, खराबझालेले ओटे, पिण्याच्या पाण्याचा अभाव आदी समस्यांनी स्मशानभूमीचा वापर करणे अवघड झाले आहे. त्यामुळे स्मशानभूमीत कचरा की कचºयात स्मशानभूमी असा येथील नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासनाला सवाल केला आहे. गावातील वाढती लोकसंख्या पाहता ही एकमेव स्मशानभूमी असून या स्मशानभूमी परिसरात बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पक्का रस्ता, विजेचे दिवे, शोक सभेकरिता पुरेसा सभा मंडप इत्यादी समस्या लवकर मार्गी लावण्याची ग्रामवासीयांची मागणी आहे.

स्मशानभूमी परीसरात अतिक्रमण

सदर स्मशानभूमी परीसरात अनेकांची शेती असून येथील शेतकºयांनी स्मशानभूमी जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर प्रकार ग्राम पंचायत प्रशासनाला माहित असतांनाही येथील अतिक्रमण काढले जात नाही, याला काय म्हणावे. एकंदरीत ग्राम पंचायत प्रशासनाला या स्मशानभूमीच्या समस्या, येथे लागणाºया सुविधा तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही, विजेची सोय नाही, पाण्याचाही पत्ता नाही या सर्व समस्या प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त प्रश्न गावकºयांना पडला असून स्मशानभूमी परीसरात केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *