लाखनीच्या बी.डी.ओ.नी घेतली गुजरात मशीन?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील बीडीओ यांनी गुजरात मधून मशीन घेतली असल्याची चर्चा असून त्या मशीन मध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारी घातल्या की अहवाल मात्र क्लीनचीट निघत असल्याने या मशीनबाबत चर्चा मात्र जोमात सुरू आहे ही मशीन तक्रारकत्यार्ला केराची टोपली दाखवीत असून ज्याच्याविरुद्ध तक्रार केली त्या कर्मचº्याकडून वजन ठेवून त्या तक्रारीच्या अर्ज मशीन मध्ये टाकला की अहवालही निर्दोष येत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास तालुक्यातील मौजा सोमलवाडा / मेंढा येथील एका माजी पदाधिकाº्यांनी तेथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे तसेच झालेल्या कामाचे योग्य मोजमाप करावे व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा असे विनंती अर्ज करून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्यांनी दिलेले तयार अर्ज तक्रार अर्ज ह्या गुजरात मशीन मध्ये तर टाकण्यात आले नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता तालुक्यातील जनतेने न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मौजा सोमलवाडा / मेंढा येथील जलजीवन कामाची सुद्धा तक्रार करण्यात आली गावाला पाणीपुरवठा करणाº्या बोरवेलचे ६० मीटर खोदकाम झाले असताना त्यात ९० मीटर केसिंग पाईप टाकण्यात आली. असल्याचे बिलामध्ये नमूद करून त्या देयकाची उचल करण्यात आली ती तक्रार सुद्धा गुजरात मशीन मध्ये गेल्याने त्यावर अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

ही मशीन खंडविकास अधिकाº्यांसाठी महत्त्वाची ठरली आहे तालुक्यात घरकुलधारकांचा प्रश्न त्याच्या समस्यासुद्धा अनेक असणारी करून त्याही तक्रारी गुजरात मशीन मध्ये गेल्याने कारवाई शून्य दिसून येत आहे. लाखनीच्या खंडविकास अधिकाº्यांसाठी ही गुजरात मशीन प्रेरणादायी तर ठरत नाही ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे येथील खंडविकास अधिकारी हे मूळचे तालुक्यातीलच वास्तव्यातील असून पंचायत समिती स्तरावरील समस्यांचा त्यांच्याकडून निराकरण व्हावा ही जनतेची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे मात्र त्यांच्याकडे असलेली ही मशीन समस्या मार्गी न लावता उलट समस्या दडपल्या असल्याची चर्चा आहे आपल्या तालुक्यातील जनतेचा विकास व्हावा ही जनतेची कल्पना असली तरी ती कल्पना मात्र भ्रामक ठरत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *