कलाकारांच्या भवितव्यासाठी मी सदैव तत्पर- राजेंद्र बावनकुळे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा : येथे भव्य दोन दिवसीय कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात भंडारा जिल्ह्यातील तसेच परत जिल्ह्यातील भजन व इतर कलावंतांनी भाग घेतला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समाधान सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाल ठवकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय कलाकार शाहीर मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, माऊली इंडस्ट्रीजचे एमडी प्रल्हाद किंमतकर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर, शाहीर भगवान लांजेवार, शाहिर किरकूट, पुंडेकर, पंचायत समिती सदस्य देवानंद लांजे, माजी जिल्हा सदस्य केके पंचबुधे, सरपंच धनराज आगासे, उपसरपंच हंसराज ठवकर, पत्रकार संजय बडवाईक, सामाजिक कार्यकर्ता रवींद्र पंचब्बुदे, ग्रामपंचायत सदस्य रोशन मने, शैलेश कोलाटकर, युवराज भोयर, हेमंत आगासे, इंजिनीयर संजय रहागडले, विनोद कुकडे, अलका झंजाळ सरपंच, शाहीर यशवंत तीतीरमारे, मोहाडी अध्यक्ष पंढरी जंजाळ तुमसर, सचिव प्रेमलाल भोयर, महिला संघटिका भरती साठवणे, अजय यादव व बंडू गुड्डू कुंभलकर तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कलावंतांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, कलावंत हा आपल्या कलेच्या वर्ष स्वत:च्या आणि परिवाराच्या पालनपोषण करत असतो. या कलावंत कुठेतरी दबला आहे. या कलावंतांना जिवंत ठेवण्याकरिता व त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याकरिता मी सदैव कलावंतांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचण्याचा व कलावंतांना लाभ देण्याच्या अतोनात प्रयत्न करीन असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तुमसर तालुका भारतीय कलाकार शाहीर मंडळाचे अध्यक्ष नाना ठवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन पोटभरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुमसर आणि मोहाडीच्या भारतीय कलाकार साहेब मंडळाचे पदाधिकाºयांनी प्रयत्न केले. कलाकार मेळावा मध्ये एकूण ५० भजन मंडळांनी भाग घेतला होता. त्यात एकेरी कलावंतांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *