खोलमारा शेत शिवारात ४ बिबट्यांचा वावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- तालुक्यातील जुना खोलमारा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात फळ भाज्या व धान पिकाची शेती करण्यात येते. ३ मार्च रोजी रात्री ९ च्या दरम्यान रस्त्याने ये — जा करणाºया नागरिकांना जैतपूर खोलमारा रस्त्यावरील आंब्याच्या झाडावर चार बिबट दिसून आल्याने शेतकºयांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहिती नुसार जैतपूर ते जुना खोलमारा हा मुख्य मार्ग असून या रस्त्यावरील कडेला आंब्याची झाडे आहेत. याच रस्त्याच्या बाजूला नाला आहे. सध्या उन्हाळी धान पिकाची लागवड केली असल्याने व काही शेताना इटीया डोह धरणाचे पाणी मिळत असल्याने या नहरात पाण्याचा प्रवाह नेहमीच असतो.

त्यामुळे खोलमारा शेत शिवारात वानरांचा मोठया प्रमाणात उपद्रव दिसून येतो. खोलमारा येथील रहिवाशी ईश्वर हेमणे व रतन थाटकर हे रात्री ९ च्या सुमारास खोलमारा वरून जैतपूर कडे आपल्या चार चाकी वाहनाने जाण्यासाठी निघाले. रत्यावर वळण असल्याने गाडीचा वेग कमी करून जात असताना रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाच्या बुंद्याशी एक बिबट दिसला. या दरम्यान गाडी थांबवून बघितले असता एका पाठोपाठ आणखी तीन बिबट वाघ झाडावरून उतरताना दिसून आले. व हे वाघ खोलमारा शेत शिवारात निघून गेले. याची माहिती हेमने यांनी फोन वरून ग्रामस्थांना दिली असता गावकरी मोठ्या संख्यने घटनास्थळी जमा झाले. यावेळी झाडावर बघितले असता वानराचा कळप दिसून आला.

सदर बिबट वाघ हे वाणरांच्या शिकारी साठी झाडावर चढले असावे असा अंदाज नागरिकांनी वर्तविला आहे. ग्रामस्थांनी बिबट्याचा शोधाशोध केले असता. तोपर्यंत ते पसार झाले होते.खोलमारा गाव हे चुलबंध नदी तटावर वसलेले असून येथे मोठया प्रमाणात बाराही महिने भाजी पाल्यासह इतर पिके घेण्यात येतात. सध्या भाजी पाल्यासह धान पिकाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र दिवसा व रात्री भारनियमनाचा वेळापत्रक असल्याने रात्री बे रात्री धानाला व पालेभाज्यांना सिंचन करण्याकरिता शेतकºयांना शेतावर जावे लागते.

अशा परिस्थितीत चार बिबट दिसल्याने शेतकºयांत भीती निर्माण झाली आहे. या बिबट यांची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन परिक्षेत्र कर्मचारी . एस. जी खंडागळे, बी. एस. पाटील, आर . ए मेश्राम, एस .ए .नरवाडे, सर्पमित्र एकांश चव्हाण, व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान त्यांना झाडावर बिबट वाघाची ओरबडलेली नखे व पायांची चिन्हे आढळून आली.वन विभागाचे कर्मचारी आले मात्र फटाके फोडून गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सदर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी यादरम्यान ग्रामस्थांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *