जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक झाले खेळाडू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सर्वच अधिकारी सळसळत्या रक्ताचे आहेत. शासकीय निर्णय तेवढ्याच तडाक्यात घेण्याचा या अधिकाºयांनी पायंडा पायला आहे. जवळपास समवयस्क असलेले अधिकारी आपल्या कर्मचाºयांनाही प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येत असल्याचे वर्धेकरांनी अनुभवले आहे. वर्धेतील क्रीडा संकुलावर खा. रामदास तडस यांच्या वतीने खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. त्या महोत्सवाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिपचेमुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित होते. समोर खेळाचे मैदान बघून या तरुण अधिकाºयांनाही राहवले नाही आणि अधिकाºयाांनी चक्क कॅरमवर स्ट्रायगर फिरवले आणि अन् राणी टिपण्याचा प्रयत्न केला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनीही प्रशासनाला शासनाचा हातभार लावला. स्थानिक क्रीडा संकुल येथे खा. रामदास तडस यांनी क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हपरिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळापे या अधिकाºयांची उपस्थिती होती. नेमकी कॅरम स्पर्धा सुरू होण्यावेळी मान्यवर आल्यानंतर यांच्याच सहभागासह स्पधेर्ला प्रारंभ करण्याची सूचना खा. तडस यांनी केली. महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी तर जिपच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्य कार्यपालन अधिकारी घुगे यांनी सहभाग घेऊन अधिकारी आणि सहकायार्चा उत्साह वाढवला होता. नागपुरात झालेल्या विभागीय स्पर्धेत क्रीकेटच्या स्पीचवर राहुल कर्डिले दिसले. एकंदरीत खेळकर असलेल्या प्रथम श्रेणी अधिकाºयांनी कॅरमवर ताबा घेतला आणि एक एक गोटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. कर्डिले, हसन व घुगे या तिघांना गफाट यांनी सोबत दिली. १५ मिनिटे खेळ रंगला. या खेळाची आता शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *