गोंदिया शिवसेना जिल्हा प्रमुखाचे धाकटे बंधू शिवसेनेचे माजी नगरसेवकावर भर दिवसा गोळीबार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवकावर आज गुरूवार ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीव घेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना त्यांच्याच घरा जवळील हेमू कॉलानी चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार सध्या शिवसेना (उबाठा) चे शहर अध्यक्ष असलेले माजी नगरसेवक लोकेश (कल्लु) यादव (४४) हे आपल्या राहत्या घरातून मोटारसायकल ने बाहेर जात असताना त्यांच्यावर दोन अनोळखी मोटारसायकल सवार तरुणांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला व गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. या हल्ल्यात गोळी ही लोकेश (कल्लु) यादव यांच्या पाठी खाली कमरे ला लागली आहे. त्यांच्या घराजवडीलच घटना असल्यामुळे लगेच त्यांची मित्र मंडळीनी घटनास्थळ गाठून त्यांना जखमी अवस्थेत गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची अवस्था बघून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना त्वरित नागपूर ला हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती गोंदिया शहरात वाºया सारखी पसरली असता लोकांनी घटना स्थळी व नंतर के. टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. काही काळ पुरता शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सराफा लाईन येथील दुकान दारांकडून आपली नुकतीच उघडलीले दुकाने बंद करण्यात आली होती. पण पोलिसांनी लगेच संवेदनशील क्षेत्रात बंदोबस्त तैनात केल्यामुळे वातावरण एक दोन तासानंतर शांत झाले. गोंदिया शहर पोलीस चे सहायक पोलीस निरीक्षक घटनास्थळापासून जवळच असलेले सर्व सी सी टी व्ही कॅमेरे तपासून बघितले जात आहेत. यामुळे लवकरच गोळीबार करणारे कोण आहेत हे कळू शकणार ! हा गोळीबार करणाºया आरोपींच्या शोधात गोंदिया पोलीस दलाचे चार पथक तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले आहेत. तर स्वत: पोलीस अधिक्षक यांनी घटना स्थळी भेट घेऊन व रूग्णालयात जाऊन माहिती घेतली आहे. तर लवकरच घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणार असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *