वर्षभरात ८ हजार २९९ शेतकºयांना नव्या वीज जोडण्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया/भंडारा : महावितरणच्या वतीने मागील वर्ष २०२२-२३ मध्ये गोंदिया परिमंडळात ८ हजार २९९ शेतकºयांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीतील ६७१ तर अनुसूचित जमातीतील ५०२ शेतकºयांचा सहभाग आहे. या जोडणीमुळे शेतकºयांच्या शेतात पाणी येऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरणतर्फे शेतकºयांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी विविध योजनेंतर्गत तत्परतेने कार्यवाही केली जात आहे.

विशेषत: जिथे पायाभूत वीज जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये अनुसुचित जाती व जमातीचा ७६५ व मागास प्रवर्गातील २ हजार ३७५ जोडण्या आहेत. तसेच भंडारा जिल्ह्यातील एकूण ४ हजार २६७ शेतकºयांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती व जमातीचा ४०८ व मागास प्रवर्गातील १ हजार ९३५ वीज यंत्रणा उभारण्याची गरज नाही अश्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. गोंदिया परिमंडळ अंतर्गत येणाºया गोंदिया जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३२ शेतकºयांना नवीन जोडण्या आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात वीज जोडणी न झाल्यामुळे शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, पिकांना पाणी देण्याकरिता काय करावा, असा प्रश्नत्यांच्यासमोर उभा होता. मात्र, महावितरणच्यावतीने शेतकºयांना नवीन वीज जोडणी देण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयांना पिकांना पाणी देण्यास मोठी मदत मिळणार आहे.

वीज बिल भरून सहकार्य करावे

शेतकºयांनी अनधिकृत वीज वापर न करता महावितरणचा योजनांचा लाभ घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी. तसेच वीज बील नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *