रेती तस्करांचा देवरी तहसील कार्यालयात धिंगाणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- देवरी तहसीलदारांनी अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाºया टिप्परवर जप्तीची कार्यवाही केल्याने चिडलेल्या वाहनमालकाने तहसीलदार यांच्या कार्यालयात येऊन धिंगाना घातल्याच्या प्रकार काल रात्री सात वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, तेथे कामानिमित्त उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मोबाईलची तोडफोड करून आरोपी जप्त वाहनासह पसार झाले आहे. सदर प्रकरणी, देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नदेवरीचे तहसीलदार गौरव इंगोले हे तलाठी तितरे यांचे सह शिलापूर गावाकडे गौणखनिज तपास कामी जात होते. दरम्यान, रस्त्यात टिप्पर क्र. एमएच ४०१६१८ हा रेतीची वाहतून करीत असताना आढळून आला. या वाहनाची तपासणीकेली असता सदर वाहन हा अवेधरीत्या रेतीची वाहतूक करीत असल्याने तहसीलदार यांनी जप्तीची कार्यवाही करून सदर टिप्पर ताब्यात घेतला. या प्रकरणात चिडलेला सदर वाहनाचा मालक आरोपी संतोष अग्रवाल वय (५५) आणि कुणाल अग्रवाल वय (२५), दोन्ही राहणार साखरीटोला हे तहसीलदार देवरी यांच्या कार्यालयात घुसून माझे वाहन का पडकले म्हणून इंगोले यांच्याशी हुज्जत घालणे सुरू केले. यावेळी इतर तलाठी आणि मंडळ अधिकारी सुद्धा कार्यालयात उपस्थित होते.

याशिवाय गोंदियाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सुद्धा शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात उपस्थित होते. इंगोले हे उपविभागीय अधिकारी यांना देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामात व्यस्त होते. यातील आरोपी यांनी तहसीलदार देवरी यांचेशी हुज्जत घालून तहसीलदार यांचे कडील काही महत्वाची शासकीय कागदपत्रे हिसकावून घेतली. दरम्यान, तेथेउपस्थित शिक्षणाधिकारी गजभिये यांनी सदर प्रकार आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड प्रकरण रेकार्ड करत असताना आरोपी कुणाल यांनी आरोपी संतोषच्या लक्षात आणून दिल्याने संतोष ने गजभिये यांना शिवीगाळ करून त्यांचे मोबाईल आपटून फोडले. हा फुटलेला मोबाईल आणि जप्ती वाहन व चालकासह आरोपी आपल्या चारचाकी वाहनाने पळून गेला. दरम्यान आरोपीने तहसीलदार देवरी यांच्या टेबलावरील कागदपत्रे फाडून बाहेर फेकल्या चा आरोप आहे. सदर प्रकरणी देवरी पोलिसांनी अपराध क्र.१४/२०२३ अंतर्गत कलम ३५३,३९२, १८६,४२७, २९४,५०६ आणि ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद केला असून आरोपींचा शोध देवरी पोलीस करीत असुन सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाडगे तपास करित आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *