अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रकाश आंनदराव चूधरे वय २६ वर्षे रा. रेंगेपार ता. तुमसर जि. भंडारा असे आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी ही वर्ग ८ व्या वर्गात शिक्षण घेत असुन ति तिचे आजी – आजोबाकडे राहत होती. दिनांक २४ फेब्रुु.२०१८ चे रात्री १०. ४५ वा. दरम्यान घरातील सर्व जण झोपल्यावर अल्पवयीन मुलगी आपले आजी सोबत झोपी गेली असता तिला कुत्र्यांचा भुकण्यांचा आवाज आल्याने अल्पवयीन पिडीतेला वाटले की, घरात कुणी कुत्री वगैरे आली असेल म्हणुन ती बाहेर आली. व बाहेर शौच करण्यास बसली असता आरोपी प्रकाश आंनदराव चूधरे हा तेथे आला व पिडीतेला मागेहून पकडून तिचे तोंड दाबुन तिला उचलुन बैलाच्या गोठ्यात नेले. पिडीतेने आरडाओरड केली असता तिचा आवाज ऐकुन तिचे आजोबा झोपेतुन जागे झाले व बाहेर आले असता आरोपीने आजोबाला धक्का देत शेताकडे पळुन गेला. अल्पवयीन फिर्यादीने तिचे आई-वडील व आजोबासोबत पोलीस स्टेशन सिहोरा येथे तोंडी रिपोर्ट दिल्याने अप क्रमांक ३४/१८ कलम ३५४(ब), ३२३, भादवी सहकलम ८ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात करीत आरोपीस अटक करण्यात आले.

आरोपी प्रकाशआंनदराव चूधरे वय २६ वर्षे रा. रेंगेपार यांचे विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने तपासा अंती अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश भंडारा येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले. सदर गुन्हयाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. पी. बी. तिजारे यांचे न्यायालयात चालविण्यात आली. गुन्हयात सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती दुर्गा तलमले यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दरम्यान दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी पुराव्यांच्या आधारे आरोपी प्रकाश आंनदराव चूधरे याला कलम ८ बालकांचे अधिनीयम २०१२ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व ३,०००/-रु. द्रव्यदंड व द्रव्यदंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावास, कलम ३२३ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास व १,०००/-रु. द्रव्यदंड व द्रव्यदंड न भरल्यास १ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी तुमसर श्रीमती रश्मीताराव मॅडम, सिहोरा ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार ललीत सोलंकी बं.नं.९९६, सहायक फौजदार जगदीश बुजाडे बं. नं. ३०७ यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *