पोलीस विभागाचे ‘ऑप्रेशन आॅलआउट’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा पोलीस दलातर्फे नवरात्र, व शारदा उत्सव व येणाया सणानिमीत्त जिल्हयात शांतता व सुव्यवस्था सुरळित राहावी. कोणतेही अनुचीत प्रकार घडु नये, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसावा याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात दिनांक २४ सप्टेंबर ते २५ सप्टेबर २०२२ रात्रीदरम्यान कोम्बींग / ऑप्रेशन आॅलआउट’ राबविण्यात आले. आॅपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, १७ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त कामगिरीतुन जिल्यातील ७१ आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली.तसेच तुरुंगातून सुटलेल्या ३७ आरोपींची त्याच्या घरी तपासणी करण्यात आली. १८ ठिकाणी नाकाबंदी करून ५०२ वाहनांची तपासणी करण्यात आली . मोवा. कायद्याची ४६ प्रकरणे करण्यात आली .दरम्यान ८० एटीएमला भेट देण्यात आली. ८५ समन्स/ वारंट बजावण्यात आले. १० वॉटेड/ फरार आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच बेकायदेशार१ क्रियाकलापांवर कारवाई करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *