भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सतत आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सिहोरा परिसरातील नाले तुडुंब भरले आहेत. मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणा-या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणा-या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहतूक बंद करण्याचे सूचना देण्यात आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अवकाळी पावसाने संततधारपणे हजेरी लावली आहे. सिहोरा परिसरात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात असणा-या वैनगंगा आणि बावणथडी बारमाही वाहणा-या नद्या आहेत. वैनगंगा नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आले आहेत.

या पाण्याची थोप बपेरा गावापर्यंत आहे. या गावांचे शेजारी दोन नद्यांचा संगम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पर्यंत बावणथडी नदीचे पात्र कोरडे राहते. नदीच्या काठावर असणाºया पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देण्यासाठी या चार महिन्यांत राजीव सागर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. परंतु यंदानदीच्या पात्राचे पूर्णत: चित्र बदलले आहे. आजवर कधी मे महिन्यात बावणथडी नदीला पूर आला नव्हता. परंतु मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. भर उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहून काठावरील गावकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. याच नदीवर असणाºया सोंड्याटोलाउपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करीत आहेत.

नदीला पूर आल्यानंतर वाहनांची ये-जा बंद करण्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यानंतर सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृह आॅपरेटरचे वेतन थकले असल्याने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे. बावणथडी नदीला पूर आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाºया धरणावरून पुराचे पाणी ओवरμलो झाले आहे. धरणाचे उधर्व भागात नदीचे पात्र कोरडे आहे. ओवरμलो पाण्याची गती वाढल्यास उधर्व भाग पुराचे पाण्याने समतल होणार आहे. बावणथडी नदीवरील धरणाचे उधर्व भागाचे पात्रातील मध्य प्रदेशातील सरकारने हद्दीतील रेती घाट लिलावात काढले आहे. नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात केले जात आहेत. धरणावरून पाणी ओवरμलो झाले असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.