‘सायबर क्राईम तसेच बाल लैंगिक शोषण व बालकांचे अधिकार’ विषयावर चाईल्ड लाईनतर्फे मार्गदर्शन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : साकोली तालुक्यातील विर्शी/ सीतेपार/मोखे येथे जी.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा रुरल अशोसिएशन अंतर्गत चाईल्ड लाईन भंडाराच्या वतीने “चाईल्ड लाईन से दोस्ती” सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ४३ बालक ६० बालिका ८ शिक्षक २ शिक्षिका उपस्थित असून प्रमुख पाहुणे म्हणून बी. एस. शिवरकर (मुख्याध्यापिका जी.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ कला महा- विद्यालय विर्शी) तसेच संजय खोखले (सहाय्यक पोलीस निरीक्षक साकोली) नंदकुमार गहाने (पोलिस पाटील विर्शी) भोजेंद्र गहाने सर व सर्व कर्मचारी शिक्षकवृंद) व लोकप्रिया देशभ्रतार (जिल्हा प्रकल्प समन्वयक) व चाइल्ड लाईन टीम राकेश लांजेवार, सुनील राणे, सुरेखा गायधने प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संजय खोखले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजच्या चतुर युगात जीवनात तसेच वाढत्या बेरोजगारीमुळे सोशल मीडियाच्या वापरामुळे मोठया प्रमाणात फसवणूक करून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढून सर्वसामान्य व सुशिक्षित लोकांचीही फसवणूक होत आहे.

मित्र-मैत्रिणी मोबाईल वर लिंक पाठवतात अश्या कुठल्याही लिंक ला बळी न पडता तसेच अळट चा सुरक्षीत उपयोग करून आपल्या मोबाईल वर आलेला डळढ कुणालाही सांगू नये व ० ते १८ वर्ष वयोगटातील मुला -मुलींनी सोशल मीडिया वापर योग्य करून सायबर गुन्हेगारी पासून कसे सुरक्षित राहता येईल तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता अहोरात्र मेहनत करून आई-वडील कुटुंबाचा गाळा चालवितात यामुळे बालकांकडे दुर्लक्ष होत असून बालके व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आज मोठ्या प्रमाणात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असे प्रतिपादन केले. तसेच सुनील राणे यांनी बालकांचे अधिकार व समस्या यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व युवा रुरल संस्थेबद्दल राकेश लांजेवार चाईल्ड लाईन भंडारा यांनी मार्गदर्शन केले. तसेच गुड टच व बॅड टच व बाल लैंगिक शोषण या विषयावर लोकप्रिया देशभ्रतार (जिल्हा प्रकल्प समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले तर सुरेखा गायधने चाईल्ड लाईन भंडारा यांनी बालकांकरिता कार्यरत असणाºया सरकारी यंत्रणा व त्यांचे टोल फ्री क्रमांकाचा योग्य वापर कधी करायचा व बालकांना येणाºया समस्या यांपासून कसे सुरक्षित जीवन जगायचं याबद्दल मार्गदर्शन केले.

हरवलेल्या, घरून पळून गेलेल्या, जन्म देऊन टाकून दिलेल्या, पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या, रस्त्यावर राहणाºया, बळ जबरीने कामाला किंवा भिक्षा मागायला लावलेल्या, बालकांना कोरोना काळात आॅनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास सर्व बालकांनी आपल्या पालकांना मोबाईल घेऊन मागितला व मोबाईल चा कसा चांगला उपयोग करून घेतला आणि जास्तीत जास्त बालकांनी त्याचा कसा दुरुपयोग केला यामुळे बालकांच्या कोणत्या व कशा समस्या निर्माण झाल्या यावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारे बाल सप्ताह कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांनी बालकांना मार्गदर्शन करून काही समस्या आल्यास किंवा कुठे कोणत्याही बालकांची समस्या दिसल्यास १०९८ आणि ११२ या राष्ट्रीय अपातकालीन हेल्पलाईन नंबर वर फोन करून सांगण्याचे आवाहन केले. बालकांच्या मनोरंजन आणि विकासाच्या दृष्टीने “सोशल मिडिया मोबाईल चा वापर योग्य की अयोग्य” या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाºया विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून त्यांचे उत्साह वाढविण्यात आले. सूत्रसंचालन पी. जे. लंजे व आभार राकेश लांजेवार यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *