भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज दि. १३ आॅक्टों. २०२ रोजी गुरुवारला राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय भंडारा येथे पार पाडली. बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव धनंजय दलाल, महिला अध्यक्ष सरिताताई मदनकर, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, भंडारा पं. स. सभापती रत्नमाला चेटुले , तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड व शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी संपुर्ण जिल्ह्याच्या युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रमाचा बैठकीचा आढावा दिला. तसेच यांनी त्यावेळी जिल्हयाच्या पदाधिका-यांना मार्गदर्शन केले, बैठकीमध्ये धनंजय दलाल यांनी युवकांना जनतेच्या कामासाठी निवेदने, धरणे व मोर्चे काढण्याचा सल्ला त्यावेळी दिला. युवकांच्या संघटनेमधुन समोरच पक्षाचं नेतृत्वं तयार होते त्यामुळे युवकांनी संघटनेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे मार्गदर्शन आढावा बैठकीमध्ये त्यावेळी त्यांनी केले. त्यावेळी युवक कॉंग्रेसच्या सर्व तालुका अध्यक्षांनी आपआपल्या तालुक्यांचा आढावा दिला यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे अध्यक्ष राहुल निर्वाण, व्यापारी सेलचे कार्याध्यक्ष विक्की रावलानी, महासचिव दयानंद नखाते, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष राजेश वासनिक, तालुका अध्यक्ष हितेश सेलोकर, शहर अध्यक्ष बंटी बांगडकर, साकोली तालुका अध्यक्ष अनिल टैमरे, लाखनी तालुका अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, लाखांदूर तालुका अध्यक्ष राकेश मोरेश्वर, लाखांदूर शहर अध्यक्ष रामेश्वर डोंगरवार, विशेश मेश्राम, प्रफुल गायधने, राकेश तांबुलकर, अतुल कानतोडे, भुमेश्वर गाढवे, मंगेश रेहपाडे, बंडु चेटले व मोठया संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.