रखडलेले पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत गावाचे रखडलेले पुनर्वसन कार्यांचा आढावा घेत या कार्यास गती देण्या सह, भूमी अधिग्रहण, गोसे बंधितांचा मोबदला आणि भूखंड वितरण या विषयावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज वरील विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या दालनात आयोजित बैठकी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी पिंडकेपार येथील बंधितांचा उर्वरित मोबदला लवकरात लवकर देण्याची सूचना देत करचखेडा येथील ५७ आणि बेरोडी गावातील ४३ परिवारांचे पुनर्वसन पूर्ण करण्या करता या बंधितांना तत्काल भूखंड वितरित करण्याची सूचना दिली. याच प्रमाणे गोसे प्रकल्प अंतर्गत ज्या गावकºयांची शेती अंशत: बाधित झाली आहे ती शेती सुद्धा लवकरात लवकर संपादित करून त्यांना मोबदला देण्यात यावा. सोबतच पिंडकेपार टोला चे तत्काल सर्वे करून या गावाचे पुनर्वसन कसे करता येईल याचा प्रयत्न करण्याची सूचना आ. भोंडेकर यांनी बैठकीत उपस्थित अधिकाºयांना दिल्या.

आ. भोंडेकर यांनी जिल्हाधिकारींना पुढील सोमवारी या विषयांवर बैठक घेऊन आढावा घण्याचे आणि आवश्यक प्रस्ताव सादर करून घेण्याची सूचना दिली. या वेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांशी आ. भोंडेकर यांनी संवाद साधला आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून पाठविण्यात आलेला १९ गावांचा प्रस्ताव हा शासनाकडे पोहोचला असून या प्रस्तावाला पुढील आठवड्यात मंजूरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शासन दरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावातिल १९ गावं मध्ये मुजबी, दवडीपार, सलेबर्डी, करधा, तिड्डी, कोरंभी देवी, कोथूर्णा, खैरी(बेटाळा), कोंढि, कावडशी, बेरोडी टोला करचखेडा, जमणी, लोहारा, पेवठा, खमारी, खापा, दाभा आणि पवना खुर्द या गावांचा समावेश आहे. याच बरोबर पवनी तालुक्यातील वानक्षेत्राला लागून असलेल्या गावांच्या नागरिकांना शेतात काम करीत असताना वन्य प्राण्यांपासून धोका असतो. अश्या शेतीला शासकीय योजनेतून कुंपण करता येईल का यावर तोडगा काढण्याच्या सूचना सुद्धा आ. नरेंद्र भोंडेकर यांनी दिल्या. आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ढेंगे मॅडम, आपत्ति व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *