डॉ. फुके यांच्या दौºयाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील जनतेच्या समश्या, ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामाची अडचण तसेच कार्यकर्त्या सोबत चर्चा समजून घेण्यासाठी डॉ. परिणय फुकेच्या लाखांदूर तालुका दौºयाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तात्काळ सर्व प्रश्न मार्गी लावन्याचे आश्वासन फुके यांनी दिले. तालुक्यात अनेक ठिकाणी सांत्वन भेट, अनेक ग्रामपंचायतीना भेटी घेवून समश्या ऐकून घेतल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. डॉ. परिणय फुकेच्या मोहरणा येथील भेटीत नागरिकांच्या अनेक समश्या मार्गी लावन्याचे आश्वासन डॉ. परिणय फुके यांनी दिले. यामध्ये प्रामुख्याने बाजार चौक परिसर सौंदर्यकरण, पांदन रस्ते व घराच्या नमुना ८ वर सरकार असल्यामुळे घरकुलचा लाभ घेता येत नाही. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांचेशी बोलून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मातोश्री पांदन रस्ते तात्काळ सुरु करण्याचे आश्वासन दिले.

सरपंच मोहरणा निलेश बोरकर यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. कृषि ऊत्पन्न बाजार समितीमध्ये काही केंद्र चालक व शेतकºयांनी धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्या. लगेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा यांना भ्रमणध्वनी वरुन शेतकºयांसमक्ष बोलून तात्काळ शेतकºयांचे धानाचे चुकारे अदा करण्याचे आदेश दिले. यावेळी शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. दौºया प्रसंगी . तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, नूतन कांबळे, विलास तिघरे, प्रमोद प्रधान, राहुल कोटरंगे, पुरुषोत्तम ठाकरे, शिवाजी देशकर, प्रतीक उईके, कांचन गहाने, रज्जु पाठन, सुरेश नागपुरे, प्रल्हाद देशमुख, गोपाल तहेर्कार, तुळशीदास बुरडे, अजय कोडापे, विजय खरकाटे, भारत मेहेंदळे, वासुदेव तोंडरे, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *