गुरूनानक जयंती उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वरठी : शिख धर्माचे संस्थापक श्री गुरूनानक यांची ५५३ वी जयंती वरठी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. विश्वशांतीचा संदेश देणारे व कल्याणकारी मानवी जीवनाची प्रस्थापना करणारे गुरूनानक हे शिख सिंधी समुदायाचे श्रध्देय असून त्यांच्या विचार, कार्य आणि आचारधर्माचे पालन आजही केले जाते. मानव कल्याणाचा संदेश देणारे गुरूनानक देव यांची जयंती वरठी येथे शिख बांधवांनी उत्साहात साजरी केली. यावेळी गुरू ग्रंथसाहेब व गुरूनानक साहेब यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. यावेळी इंदल सहजसिंघानी, जितू सहजसिंघानी, अशोक हसरानी, दीपक हसरानी, शंकर हसरानी, सचिन आहुजा, हरीश अंगवानी, महेश खानवानी, बाबु वाधवानी, मनिष पुरुषलानी, नरेश सहजसिंघानी, दिनेश सिंघानी यांच्यासह मोठ्या संख्येने शिख बांधव उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *