आमदारांकडून सोंडयाटोला सिंचन प्रकल्पाची पाहणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शेतकºयांना सिंचनाची गैरसोय होऊ नये म्हणून पहाणी करण्याच्या दृष्टीने आ. राजू कारेमोरे यांनी सोेंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाला भेट देत पहाणी केली. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे ६ पंप सुरू असून ३ दूरुस्तीला देण्यात आले आहेत. प्रकल्पात जलसाठा वाढावा म्हणून पाणी अडविण्यात आले. काही कारणास्तव प्रकल्पाची विद्यूत पूरवठा बंद होता, मात्र तो लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती अभियंता सिडाम यांनी आमदार कारेमोरे यांना दिली. प्रकल्पाचे पाणी चांदपूर जलाशयात सोडून तेथून नहराद्वारे शेतीला पाणी देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत नहर बंद करू नये, असे निर्देश यावेळी आमदारांनी अधिकारी वगार्ला दिले. प्रसंगी माजी सभापती तुरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *