कुंभली येथे दोन गटात तुफान राडा

साकोली : तालुक्यातील ४६ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानला शांततेत सुरवात झाली मात्र तालुक्यातील कुंभली येथील मतदान केंद्रावर दोन गटामध्ये तुफान राडा होवुन हाणामारी झाल्याचे दिसुन आले. कुंभली या गावात मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका विशिष्ट गटाच्या उमेदवाराला मतदान केंद्र परीसराच्या आतमध्ये तर दुसºया गटाच्या उमेदवाराला बाहेर ठेवल्यामुळे हा वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी पोलीसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने हा वाद लगेच मिटला. मात्र या झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण दिसुन आले. पण काही वेळानंतर हा तणाव निवाळला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *