पक्ष्यांची शिकार करणारा शिकारी जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : नदीपात्रात जाळे टाकून प्रवासी पक्ष्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई करून एका शिका-याला ताब्यात घेतले आहे. आकाश राजू मेश्राम रा. कोदुर्ली असे आरोपी शिका-याचे नाव असून त्यांच्याकडून ४९ पक्षी जप्त करण्यात आले. सदर कारवाई पवनी तालुक्यातील भोजापूर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई वनसंरक्षक आर.बी. गवळी यांच्या मार्गदर्शनात पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.डी. बारसागडे, वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. धोकळ, वनपाल एच.डी. गुप्ता, एम.टी. डहाके, वनरक्षक ए.पी. झंझाळ, एस.पी. घुले, आर.बी. घुगे यांनी केली. थंडीच्या दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात अनेक प्रवासी पक्ष्यांचे मुक्तसंचार दिसून येते. यामध्ये तारवली पक्षांचा समावेश आहे. पाठीकडून चमकदार आणि पोटाकडून निळा पांढरा रंग असणा-या या पक्षांची निवड ते होतंगेलेली व दुभंगलेली शेपटी असते. त्या शेपटीतून दोन तंतू सारखी पिसे बाहेर आलेली असतात. या पक्षांना तारवाले तर काही भागात पाकोळी भिंगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *