देशी दारुच्या १० पेट्यांसह आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पोलिस पथकाने धडक कारवाईकरत बेकायदेशीर रित्या देशी दारू विक्री करणाºया आरोपीला १० पेट्या दारूसह अटक केली. विजय सेवकराम वैरागडे (४०) रा. फुलचुर असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज मंगळवार १३ डिसेंबर रोजी शहरातील आरटीओ कार्यालयाच्या मागे फुलचू नाका येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातुन ३३ हजार ६०० रुपये किमतीच्या १० पेट्यांमधून ४८० नग देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरमागार्चा उपयोग करून मतदारांना विविध आमिषे दिली जातात. दारूचे वाटपही केले जाते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंद्याचे उच्चाटन व आळा घालण्याकरीता नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. आज पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील फुलचूर नाका येथे पोलिस पथकाने आरोपी विजय वैरागडे यांच्या घरी धाड घातली. धाडीत आरोपीच्या घरी १० पेट्यांमध्ये ४८८ नग देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पालिस स्टेशन येथे आरोविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून मुद्देमालासह आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोलिस नायक शैलेष निनावे, पोलिस शिपाई सन्नी चौरसिया, दया घरत, चालक पोलिस शिपाई हरिकृष्णा राव यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *