वयाची १८ वर्ष पूर्ण करणाºया सर्व नागरीकांनी मतदार नोंदणी करावी -जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मतदार यादीचा विशेष पुनर- ीक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व मतदार यादीचे शुध्दीकरणासह लोकशाही मजबूत करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे अध्यक्ष व सचिव यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत गोंदिया जिल्हयातील विधानसभा मतदार संघातील एकुण १२८२ मतदान केंद्रावर केंद्र स्तरीय प्रतिनिधीची ( इछअ ) नियुक्ती करण्याबाबत व सदर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत मतदार यादी ‘शुध्दीकरण करण्याच्या कामासाठी केंद्रस्तरीय अधिकारी ( इछड ) यांना सहयोग देण्याची विनंती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी यावेळी केली. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत २१ जुलै २०२३ (शुक्रवार) ते २१ आॅगस्ट २०२३ (सोमवार) पर्यंत गोंदिया जिल्हयातील विधानसभा मतदार संघातील एकुण १२८२ केंद्रस्तरीय अधिकारी ( इछड ) मार्फत मतदार शुध्दीकरण करण्याअंतर्गत घरोघरी भेट देणार आहेत.

सदर मतदार यादीतील दुबार, कायम स्वरुपी स्थलांतरीत व मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीतील मतदारांच्या नावात, जन्म दिनांक व इतर काही दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यात येणार आहे. आधार अद्यावत न केलेल्या मतदारांकडून आधार क्रमांक गोळा करण्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील वयाची १८वर्ष पूर्ण करणाºया सर्व नागरीकांनी नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच १ जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाºया संभाव्य मतदारांनी किंवा ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी ओळखपत्र, आधारकार्ड, रहिवास पुरावा, नात्यातील किंवा शेजारी राहणाºया मतदाराचे इपीक कार्ड इत्यादी कागदपत्रासह फॉर्म नंबर ६ भरुन आपले नांव मतदार यादीमध्ये नोंद करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *