गोंदियात पिकली लालबुंद स्ट्रॉबेरी

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी गोंदिया : योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर प्रतिकुल भौगोलिक वातावरणातही जिल्ह्यातील एका शेतकºयाने लालबुंद स्ट्रॉबेरीचे उत्पदन घेण्याची किमया केली आहे. तालुक्यातील चारगाव येथील प्रयोगशिल शेतकरी संजय जसाणी हे त्यांच्या २२ एकर शेतीत भाजीपाला पीक घेतात. स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फु्रट यासारखे नवनविन फळ लागवडीचे प्रयोग कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जसाणी करतात. त्यांनी नव्यानेच २० आर जागेत ४५०० स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. त्यापासूनत्यांना स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरु आहे. २०० ग्रॅमच्या डब्याची पॅकींग करुन गोंदियाच्या बाजारात विकह्यी करीत आहेत. स्ट्रॉबेरीचे १.५ टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी स्ट्रॉबेरी क्षेत्रात वाढ करण्याची इच्छाही जसाणी यांनी मिळता नफा पाहून व्यक्त केली. माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या वतीने येथील प्रशासकीय इमारतीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ ‘मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन’ कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *