गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भक्तीमय कार्यक्रमांची मांदियाळी

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त आज भंडारा येथे सर्वत्र ‘गण गण गणात बोते’ मंत्राचा जाप करीत विविध भक्तीमय कार्यक्रमांची मांदियाळी होती. गजनन मंदिरात भाविकांची रिघ लागली, तर पालखी, शोभायात्रा, भजन, किर्तन व झूनका भाकर आवर्जुन असलेल्या महाप्रसादाचे सेवन करून भक्तगण महाराजांच्या चरणी लीन झाले. गण गण गणात बोते म्हणजे जीवआणि ब्रम्ह वेगळे नसून एकच असल्याचा मंत्र देणारे गजानन महाराजयांचा प्रकटदिन आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. ‘गण गण गणात बोते’ चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्रीगजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा झाला. हजारोच्या संख्येने भाविकांनी मंदिरात जावून गजानन महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेतले. प्रगट दिननिमित्त महाल रोडवरील गजानन मंदिर, खांबतलाव रोडवरील रिध्दीसिध्दी गजानन मंदिर, राजीव गांधी चौक, खातरोड अशा विविध ठिकाणी झूनका भाकर व महाप्रसाद वितरीत करण्यात आले. दिवसभर ठिकठिकाणी चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपुर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *