ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक व्हावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रत्येक नागरिक दैनंदिन जीवनात ग्राहक असून, त्याला भारतीय संविधानाने दिलेले हक्क सर्वप्रथम समजून घ्यावे. प्रत्येक नागरिकाने ग्राहक म्हणून आपल्या हक्कांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आज विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून श्री. वंजारी बोलत होते. या चर्चासत्राला सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,सचिन डोंगरे, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री बी.गोपनारायण, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तथा प्रमुख वक्ता, नितीन काकडे, अशासकीय सदस्य श्रीमती अनिता जायस्वाल,यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी २४ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या ‘कन्झुमर प्रोटेक्शन इन द इरा आॅफ ईकॉमर्स अ‍ॅन्ड डिजीटल ट्रेडस्’ या संकल्पनेवर आधारित हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ग्राहकांना ग्राहक संरक्षण आयोगाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काबांबत जागरुक असणे गरजेचे असून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल ग्राहक संरक्षण आयोगाकडे तक्रार करण्याचे प्रतिपादन श्री. वंजारी यांनी यावेळी केले. ग्राहकांना सुरक्षेचा, निवडीचा, माहितीचा आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ग्राहक संरक्षण कायद्याची अमंलबजावणी सुरवात केली.

आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री बी. गोपनारायण यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या कायद्यामधील तरतुदी बद्दल अनिता गोपनारायण यांनी माहिती दिली. ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यवहार सुद्धा आता ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे दाखल केल्या पाहिजेत. त्यांच्या तक्रारी सकारात्मकपणे आयोगाकडून विनाविलंब निकाली काढल्या जातात तसेच ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबाबत योग्यत ती माहिती घ्यावी. विविध विषयाशी निगडीत तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी शेतकरी किंवा ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी, दक्षता आणि टाळावयाच्या चुका याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अखिल भारतीय ग्राहक पंचायत तथा प्रमुख वक्ता,नितीन काकडे,यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपीका अन्नपुर्णे, तसेच प्रास्ताविक शसचिन डोंगरे, तर आभार प्रदर्शन श्री.चौडिये यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *