मोहाडीकरांची चिंता मिटणार-डॉ.परिणय फुके

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत मोहाडी येथे ३० कोटी २७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या हुतात्मा स्मारकाच्या आवारात दत्तजयंतीनिमित्त मंगळवार दि.२६ डिसेंबर २०२३ ला दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले आहे. अनेक दिवसापासून पाणीटंचाईशी लढणाºया मोहाडीकरांना दिलासा मिळणार आहे. नगरपंचायत मोहाडी अंतर्गत पाणीपुरवठा योजना साकारली जाणार आहे. बहुप्रतिक्षित असणाºया या पाणीपुरवठा योजनेचे उद्घघाटन माजी पालकमंत्री व विधान परिषद सदस्य डॉ.परीणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी आमदार राजू माणिकराव कारेमोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील मेंढे होते. मंचावर नगराध्यक्ष छाया डेकाटे, माजी खासदार शिशुपाल पटले, उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, पाणीपुरवठा सभापती देवश्री विजय शहारे, सभापती दिशा दिनेश निमकर, सुमन गणेश मेहर तसेच नगरसेवक महेश निमजे, यादोराव कुंभारे, वंदना कृष्णा पराते, मनिषा गायधने, सविता विलास साठवणे, हेमचंद पराते, ज्योतिष्य नंदनवार, अश्विनी प्रवीण डेकाटे, रेखा मनोहर हेडाऊ, पुनम महेंद्र धकाते, पवन चव्हाण, शैलेश गभने, भगवान चांदेवार, पंकज बालपांडे, दिनेश निमकर, नरेश गणवीर, दिनेश देवगडे, सुनील भांडारकर आदींची उपस्थिती होती.

पाहुण्यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. प्रास्ताविकातून उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने यांनी ग्रामपंचायतच्या २०१५ च्या स्थापनेपासून मोहाडीचा कसा चेहरा मोहरा बदलला याची माहिती दिली. तसेच महत्वकांक्षी पाणीपुरवठा योजनेसाठी आटापिटा सहन करावा लागला याची माहिती दिली. अनेक वर्षापासून या संदर्भातील मागणी माज्यापर्यंत आणि इतर सर्व नेते मंडळीपर्यंत होत होती आणि ज्यावेळेस नगरपंचायतीची निवडणूक होती. त्यावेळेस ती मला या भागामध्ये प्रचार करत असताना मला लोक म्हणत होते. कोणतेही काम केले नाही तर चालणार पण आमच्या सर्वात महत्त्वाची जी योजना पाणीपुरवठा योजना त्यांचा सभा झाली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीसाठी इथे प्रचार करण्याकरता इथे आलेले होते आणि त्या सभेमध्ये मी वचन दिले होते की, येत्या सहा महिन्यात ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून देणार, ते योजनेला ज्यावेळेस मी बघितले की, तुम्हाला विशेष करून म्हणजे तुमच्या नगराध्यक्ष आणि बाकी सगळेच आहेत. पण सातत्याने दिनेश निमकर असणार सचिन गायधने, यादवराव कुंभारे असणार १०० वेळा मुंबईला भेटत होते.

माज्या मागे लागायचे, मला घेऊन जायचे, अधिकाºयांकडे आणि ते काम कसे आपले काम झाले पाहिजे आणि पाणीपुरवठा योजना करायची, प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळायला पाहिजे या भावनेत या सगळ्या लोकांनी फार मेहनत केली. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशभरात कोणताही गाव बिना पाण्याचा राहू नये याकरता त्यांनी हर घर पाणी, हर हर नल मे जल ही योजना एक महत्त्वाकांशी जल जीवन मिशनचे अंतर्गत एक मोठी महत्त्वाची योजना आपल्या देशात लागू केली. मला वाटते पंधराशे गावात काम सुरू आहे, प्रत्येक घरात घरा घरात नळ असला पाहिजे त्या नळाला पाणी असले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे पाणी मिळाले पाहिजे याकरता माननीय मोदीजींनी ही प्रयत्न केले आणि एक चांगली एक महत्त्वाची योजना आणली त्यांची योजना पाणीपुरवठा योजना आणली. नगरपंचायतचे नगरसेवक सचिनने सांगितले की, एक चांगला भाषण त्यांनी दिलासा की माहिती दिली. म्हणून मला असे वाटते की मला काहीतरी योजनेची माहिती देण्याची गरज नाही पण इथे ते कॉन्टॅक्टर सुद्धा उपस्थित आहेत. काम एक वर्षात होईल मला वाटत नाही कारण फार अडथळे असतात आणि नागरिकांनी समजून घेतले पाहिजे,टेंडरचा कालावधी १८ महिन्याचा आहे.दोन वर्ष शंभर टक्के लागणार आहेत आणि त्याच्यानंतर एक वर्ष आणखी भुयारी गटार योजना लागणार आहेत. आणि हे दोन्ही काम आपल्याला एकदा झाले की पुढच्या पन्नास वर्षे कुठे बघायची गरज नाही हे दोन्ही काम झाले.त्यानंतर रस्ते पूर्ण १०० टक्के रस्ते आपण करून देऊ सर्व काम झाले तर नगरसेवकांची गरज काय?काम सोडून द्या गावाचा विकास झाला पाहिजे.

पण सचिनने आपल्या प्रस्तावनामध्ये तीन-चार काम मला मागितले एसटीपी प्लांट म्हणजे आपला जे भुयारी गटाच्या पाण्याचा तिला कुठेतरी शुद्धीकरणाचा प्लांट आणि भुयारी गटारी योजना १०० टक्के आज आपल्याला शब्द देतो जसा मी मागे दोन वर्षाआधी तुम्हाला शब्द दिला होता.निवडणुकीमध्ये ही बाब तुमचा पाणीपुरवठा योजना मंजूर करणार आज शब्द देतो की वर्षभराच्या आत ती योजना याच ठिकाणी आपण त्याचा भूमिपूजन करू ही योजना आपण लवकरात लवकर करून टॅक्स संदर्भात किंवा काहीतरी त्यांनी म्हटले अरे खरंच लोकांना पाणी सारख्या ज्या अत्यावश्यक गोष्ट आहे.तिचा जर पुढचा काम झाली तर फार आनंद होतो.या पाणीपुरवठा योजना तर ज्यावेळेस लोकार्पण होणार लोकांच्या घरी पाणी जाणार त्यावेळेस खरा आनंद आपल्या आयुष्यातला तो राहणार. आपण इथे मला बोलावले आणि माझा सत्कार करून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानत असल्याचे प्रतिपादन उद्घघाटनप्रसंगी डॉ.परिणयदादा फुके यांनी व्यक्त केले. मोहाडी येथे भुयार गटारी योजना वर्षभरात देईल. पुरवठा योजनाचा लोकार्पण सोहळा लवकरच करताना तुम्हाला दिसणार आहे. आमच्या पाठीशी उभे असेल तर मोहाडीच्या विकास अतिशय जलद गतीने करू.पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही.

याची काळजी घेऊ. तसेच गरीब प्रत्येक जनतेला घरकुल मिळेल असे आश्वासन खासदार सुनिल मेंढे यांनी दिले. आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले,आतापर्यंत आपण विकास करण्यासाठी मोहाडी शहरात ८ कोटीच्यावर निधी आणला. अपूर्ण असलेले काम याची काळजी घेतली जाईल. काही दिवसातच मोहाडीतील अंगणवाडी डिजिटल झालेली दिसेल. येथील आरोग्याची सेवा चांगले देण्याच्या प्रयत्न करत आहोत. शेतकरी व गरीब मजुरांच्या हाताला नेहमी काम मिळेल याची योजना आखली गेली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष छाया डेकाटे,पाणीपुरवठा सभापती देवश्री विजय शहारे यांनी पाणीपुरवठा योजनेबद्दल त्रुटी संदर्भात पाठपुरावा केल्याबद्दल आणि आणि मंत्रालयात सक्षम बाजू मांडल्याने मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांचे मनोगतातुन आभार मानले. कार्यक्रमाला दैनिक भंडारापत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख, गिरीधर मोटघरे, अफरोज पठाण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता गजानन नरवाडे, तुलाराम करांडे, पांडुरंग कापगते, सुनील गायधनी, शिवदास मेश्राम, दिलीप नंदेश्वर, श्रीकृष्ण ईलमे, मंगेश गभने, मार्कंड नंदनवार, जितेंद्र यशवंत बावणे, पल्लवी जामोदकर, रोशन हटवार, देवेंद्र गायकवाड, अमित वडीकार, यशवंत बालपांडे, देवेंद्र वाघाये, प्रकाश पडोळे, प्रशांत सोनकुसरे, पलाश मेश्राम, नितेश वैद्य, अरविंद निखारे आदींनी केले. भूमिपूजन उत्कृष्ट सोहळ्याचे संचालन नगरसेवक यादोराव कुंभारे यांनी केले. आभार नगरसेवक ज्योतिष नंदनवार यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *