जॅकी रावलानीच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या सभेला उसळला जनसमुदाय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिर सभा झाली. सदर सभेत बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संघटक जॅकी रावलानी यांच्या नेतृत्वात भंडारा शहरातील अनेक वार्डातील नागरीक एकवटले व मोठ्या संख्येने सभेत उपस्थित होते. यामुळे सभेत मोठा जनसमुदाय दिसून आला. एक सरकार जे जनतेच्या हितासाठी सतत अविरत कार्य करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, घराघरात पोहचत आहे. असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते भंडारा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले.

२०० कोटी रुपयांच्या या विकास कामांना मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आणि विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन या कामांचे उदघाटन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त जॅकी रावलानी यांनी त्यांच्या सभेत सहभागी होण्याकरिता प्रभाग २, ३, ४, ५, १४, १५ येथील जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. जनतेचा सरकारवर व आमदार नरेंद्र भोंङेकर यांच्यावर असलेला हा विश्वासच आहे की, प्रचंड प्रमाणात भंडारा शहरातील जनता जॅकी रावलानी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली व बावने कुणबी समाज सभागृहातून गांधी चौक, मुस्लीम लायब्ररी, खामतलाव चौक मार्गे माधव नगर येथे एक विशाल रॅलीच्या रूपात मुख्यमंत्र्यांच्या जाहिर सभेत सहभागी झाले. या रॅलीत जॅकी रावलानी यांच्या सोबत सतीष तुरकर, प्रवीण कळंबे, सैफी खान, नितीन निनावे, बंटी वाधवानी, गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, अमित दलाल, सागर रायपुरकर, जीतु नखाते, नरेश बरबरैया, आकाश खरोले, अमन नंदुरकर, मंगेश मुरकुटे, दिपक भोजवानी आणि चंद्रशेखर बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या जाहीर सभेत जनतेला उद्बोधन करून जॅकी रावलानी यांनी जनतेचा विश्वास जिंकला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *