गाहकानी नहमी जागरुक असण गरजच – चारु डोगर

गोंदिया : बाजारातील वाढत्या स्पर्धेचे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फायदे होत असले तरी काही ठिकाणी मात्र त्यांची फसवणूक देखील होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोग हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य होत आहे. वस्तु खरेदीतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरुक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या चारु डोंगरे यांनी आज येथे केले. तहसिल कार्यालय गोंदिया च्या सभागृहात आयोजित ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुनश्रीमती डोंगरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. अपर तहसिलदार विशाल सोनवणे, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे सचिव योगेश्वर सोनुले, जिल्हा व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष संजय जैन, ग्राहक पंचायतच्या जिल्हा संघटक शारदा सोनकनवरे, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष सुशील मानकर व ग्राहक पंचायतचे संघटक विजय अग्रवाल यावेळी मंचावर उपस्थित होते. श्रीमती चारु डोंगरे म्हणाल्या, दुकानातून एखादी वस्तु खरेदी केली असता त्या वस्तूची किंमत किती आहे, त्याची एक्सपायरी डेट किती आहे, त्याची क्वालिटी कशी आहे हे तपासून घेणे ग्राहकाचे कर्तव्य आहे.

दुकानदार जर वस्तुच्या किंमतीपेक्षा जास्तीचे पैसे घेत असेल तर ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण आायोगाकडे दाद मागावी. व्यापाºयांनी ग्राहकांची फसवणूक करु नये. एखाद्या वस्तुची कोणी जर खोटी जाहिरात पसरवीत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, तेव्हाच खºया अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना देवराव वानखेडे म्हणाले, दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. २४ डिसेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तरी सुध्दा सदर कार्यक्रम आज साजरा करण्यात येत आहे. ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्याहक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठीच २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर २४डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे ग्राहक म्हणून आपले अधिकार आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी सांगितले की, २४ डिसेंबर १९८६ ला ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजु- री दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्थांना प्रयत्न करावे लागले. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत. त्यानुसार ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, आपले म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करुन घेण्याचा हक्क, ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यात समावेश आहे. ग्राहक १८००-२२२२६२ या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात. तसेच www.nationalconsumerhelpline.in या वेबसाईटवर ग्राहकांच्या तक्रारी नोंदवि ल्या जातात असे ते म्हणाले. यावेळी ग्राहकांचे हक्क व सेवेबाबत योगेश्वर सोनुले, संजय जैन, शारदा सोनकनवरे, सुशील मानकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक सतीश नाईक, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ए.ए.भुजबळ, रेशन दुकानदार, विविध गॅस एजन्सीचे प्रतिनिधी यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *