दीड लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू साठा जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरातील सिंधी कॉलनीतील रावण दहण मैदानाजवळ एका घरावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दीड लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई ३ जून रोजी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना सिंधी कॉलनीतील सागर गोपलानी यांच्या घरात अवैधरित्या सुगंधित तंबाखू साठवणूक ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसपथकाने गोपलानी याच्या घरावर धाड टाकली व घराची घरझडती घेतली असता पान मसाला, पान पराग, आरएमडी, जर्दा, रजनीगंधा, पानबहार, विमल गुटखा, राजश्री, धमाल, गोल्ड तंबाखू अश्या प्रकारच्या विविध सुगंधित तंबाखूचे ७३ किलो वजानाचे ५९६ पॅकेट जप्त करण्यात आले. त्याची किंमत दीड लाख रुपये आहे.

याप्रकरणी सागरबिसमलाल गोपलानी (२३) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्त्वात सहायक पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विघ्ने, सहायक फौजदार अर्जून कावळे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे, इंद्रजित बीसेन, विठ्ठल ठाकरे, सोमेंद्र तुरकर, सुजित हलमारे, मपोशी तोंडरे, येरणे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *