ग्रामपंचायत मध्ये रंगली सरपंचविरुद्ध फ्रीस्टाइल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ग्रामपंचायत मध्ये बसलेल्या सरपंचवर गावातीलच चार ते पाच ग्रामस्थांनी प्रथम बाचाबाची व त्यातून वाढलेल्या वादातून सरपंचावर हाणामारी व त्यानंतर चाकूने हल्ला केला असल्याचा आरोप सरपंचाने केला. याप्रकरणी सरपंचाने पोलीसात केलेल्या तक्रारवरुन हल्ला करणाºयाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे काही काळापुरते गावाचे वातावरण तापले होते. सविस्तर असे की गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तूमखेडा खुर्द येथील सरपंच आशिष हत्तीमारे (३५) वर्ष हा ग्रामपंचायत मध्ये बसून असता आरोपी प्रेमलाल मेंढे (५५) यांनी ग्रामपंचायत बसलेल्या सरपंचा सोबत वाद घालून नंतर चाकूने हल्ला केला. दरम्यान ग्रामपंचायत बसलेल्या इतर सदस्यांनी लगेच सतर्कता दाखविल्यामुळे हा चाकू हल्ला टाळता आला. व इतरांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचाप्रयत्न केला.

पण हा वाद अखेर ग्रामपंचायतच्या आत मधून बाहेर पर्यंत येऊन या दोघांमध्ये फ्रीस्टाइलने हाणामारीत झाला. मात्र त्यावेळी ग्रामपंचायतीत उपस्थितांनी घटनेचे चित्रण आपल्या मोबाईल कॅमेरात केले असून समाज माध्यमावर पसरविले. याविषयी सरपंचांनी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रेमलाल मेंढे (५५) ला पोलिसांनी अटक केली आहे. सरपंचांनी आरोपीने चाकूने हल्ला केल्याचा असल्याचे सांगितले असून याबाबत आता ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी प्रेमलाल मेंढे (५५) ला ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या हल्ल्यामुळे गावातील वातावरण काही काळापुरते तापले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *