भरधाव एस टी बसच्या धडकेत दुचाकी चालक युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी खापा /तुमसर : खापा वरून स्वत: च्या शेतावर एका मजुर महिलेसोबत दुचाकीने जात असतांना तुमसर -भंडारा राज्यमार्गावरील खापा -विहीरगाव परिसरातील वळणावर एस टी बसने दुचाकीला आमोरा-समोर जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर मागे बसलेली महिला गंभिर जखमी झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. योगेश धनराज राखडे (३२) रा. खापा. ता तुमसर असे मृत दुचाकी चालकांचे नाव आहे तर धुरपता द्वाराकाप्रसाद हलमारे (४०) रा खापा .ता तुमसर असे गंभिर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे. खापा येथून दुचाकी हिरो होंडा कंपनीच्या क्रमांक एम. एच ४०- ए .एच.९४८५ या क्रमांकाच्या दुचाकीने खापा विहीरगाव शिवारातील शेतावर शेतकामासाठी महिला मजुरासह दुचाकीने जात असतांना विरुध्द दिशेने भंडारा वरुन तुमसरकडे येणाºया एम. एच ४०- एन ८२२२ या क्रमांकाच्या एस टी बसने आमोरा समोर येणाºया दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दूचाकी चालक योगेश राखडे याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली महिला धुरपता द्वारकाप्रसाद हलमारे (५०) हि मजुर महिला जखमी झाली असुन तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खापा येथील नागरीकांची गर्दी उसळली होती. सदर घटनेची माहिती तुमसर पोलीसांना होताच घटनास्थळी तुमसर पोलीस दाखल होत घटनस्थळाचा पंचनामा करुन मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत कुटुबियांच्या स्वाधीन करुन सांयकाळ पर्यत त्यांच्या पार्थिवावर खापा येथिल स्थानीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक योगेशच्या मृत्यूपश्चात पत्नी, आई, वडील, बहीन ,असा बराच मोठा आप्त राखडे परिवार आहे. योगेशच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एस टी बसच्या अपघातात ठार झालेल्या योगेशच्या कुटुबियांना शासानाच्या एस टी आगाराकडुन आर्थिक मदत देण्याची मागणी येथिल नागरीकांनी केली आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार नितिन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *