आ.कारेमोरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहाडी तालुका पदाधिका-यांची नियुक्ती करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथे झालेल्या जिल्हा सभेत मोहाडी तालुक्यातील पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पदाधिका-यांचे नियुक्तीपत्र वाटप वरठी येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. मोहाडी अध्यक्ष अनिता रमेश नळगोपुलवार, युवती अध्यक्ष शिल्पा विजय हेडाऊ, शहर अध्यक्ष पवन सदाशिव चव्हान, वरठी शहर अध्यक्ष अरविंद येळणे, शहर युवक अध्यक्ष अतुल भोवते, युवक अध्यक्ष मोहाडी तालुका रोहित बुरडे, पाचगाव जिल्हा परिषद प्रमुख रोशन लिल्हारे, डोंगरगाव जिल्हा परिषद प्रमुख हैशोक शरणागते, युवती तालुका अध्यक्ष सोनू तरारे, उसर्रा पंचायत समिती प्रमुख विष्णू भोयर, हरदोली पंचायत समिती प्रमुख ईश्वर माटे यांचे नियुक्तीपत्र तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २८ मे रोजी आ.कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *